ताज्या बातम्यामुंबईसिटी अपडेट्स

मुंबईच्या गोरेगाव भागात इमारतीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू

मुंबई | Mumbai Fire – गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai) आगीच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. आताही मुंबईमध्ये एका इमारतीला भीषण आग (Mumbai Building Fire) लागली आहे. मुंबईच्या गोरेगाव (Goregaon) परिसरात समर्थ नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागल्याची आग लागल्याची घटना घडली आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे. या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईच्या गोरेगाव भागात असलेल्या समर्थ इमारतीला मध्यरात्री तीनच्या सुमाराम आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. तर अग्निशमन दलानं 46 जणांना बाहेर काढलं आहे. तर 39 जणांवर सध्या कपूर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच महिला दोन पुरूंषाचा समावेश आहे.

सध्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तर आता त्यांच्याकडून कुलिंगचं काम सुरू आहे. दरम्यान, इमारतीला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार, या आगीत जखमी झालेल्या नागिराकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून या नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. तसंच या आगीमध्ये दुकानं आणि गाड्या देखील जळून खाक झाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये