क्राईमपुणेशिक्षण

धक्कादायक; ३ महिन्याचीशाळेची फी बाकी राहिल्याने ९ वर्षाच्या मुलाला ठेवले कोंडून

पुणे : पुण्यात आतापर्यंत शालेय फी ना भरल्याने मुलांना त्रास देण्याच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. आज सकाळी पुण्यातील खराडी येथे एका नऊ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याला तीन महिन्याची फी न भरल्याने रूममध्ये कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोठारी इंटरनॅशनल स्कुलमध्ये ही घटना घडली आहे.

याबाबत मुलाच्या वडिलांनी सांगितले कि, सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. माझा मुलगा सकाळी आनंदात शाळेत गेला होता. त्यानंतर मधल्या सुट्टीत १० वाजता शाळेतील बाईंनी त्याला वर्गातून बाहेर आणले. व एका रूममध्ये ठेवले. त्या रूममध्ये काही खेळणी असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. माझे जानेवारीपासून फीचे पैसे राहिले होते.

तीन महिन्याची एकूण ३० हजार भरायचे होते. आम्हाला ऑनलाईन पैसे द्यावे लागतात. पण टेक्निकल इश्यूमुळे काही करता आले नाही. त्यांच्याकडे माझे २५ हजार डिपॉजिट असूनही माझ्या मुलाला डांबून ठेवले. हे चुकीचे आहे. मुलांवर असा अन्याय होता काम नये. याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले आहेत.kothari international

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये