देश - विदेशआरोग्य
राज्यात लोकांचा निष्काळजीपणा, 92.5 लाख लोकांनी घेतला नाही Corona लसीचा दुसरा डोस

देशभरात कोरोना व्हायरसच्या (Corona virus) संसर्गाच्या बाबतीत मोठी घट होताना दिसत आहे. सध्या दररोज देशभरात सरासरी 10 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. पण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. यामागे लोकांचा निष्काळजीपणा असल्याचं दिसून येतेय. त्यातच महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येतेय. राज्यात सुमारे 92.5 लाख लोकांनी अद्याप लसीचा (Covid-19 Vaccine) दुसरा डोस (Second Dose) घेतलेला नाही.