आरोग्यइतर

मुंबईत आढळला कोरोनाचा नवा XE व्हेरियंट

मुंबई : कोरोना पासून सुटका होत असतानाच आता आणखी एक नवा कोरोनाचा व्हेरियंट भारतात आढळून आला आहे. आज मुंबईत कोरोनाचा नवा XE व्हेरियंट आढळून आला आहे. ३७६ नमुन्यांची चाचणी केल्यानंतर यांपैकी एक रुग्ण या नव्या XE व्हेरियंटचा संसर्गबाधित आढळून आला आहे. इंडिया टुडेनं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षाही जास्त पसरणारा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये आढळला होता. ताज्या सिरो सर्व्हेच्या अहवालानुसार, मुंबई महापालिकेनं म्हटलं की, मुंबईतील २३० नमुने सिरो सर्व्हेसाठी पाठवण्यात आले होते, यांपैकी २१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा आयसीयूची गरजही भासली नव्हती. यांपैकी XE व्हेरियंटचा एक रुग्ण तर आणखी एक Kappa व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, जे २१ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते त्यांपैकी नऊ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. तर इतर सर्वांनी एकही डोस घेतला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये