Top 5आरोग्यइतर

कोरोनाचा XE व्हेरिएंट नक्की आहे तरी काय?; जाणून घ्या…

नवी दिल्ली : कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट आत्तापर्यंत आपण पाहिलेच असतील. जवळपास २ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर आता कुठे जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आलेलं असताना पुन्हा कोरोनाच्या XE व्हेरिएंटनं सर्वांच्याच मनात धडकी भरली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा दैनिक आकडा हजारच्या खाली गेला असला तरी नव्या XE व्हेरिएंटचा पहिला रुग्ण मुंबईत सापडला आहे.

 मुंबईतील दक्षिण आफ्रिकन वंशाच्या एका महिलेला XE व्हेरियंटची लागण झाल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आला आहे. सर्वप्रथम इंग्लडमध्ये या व्हेरिएंटचा पहिला रूग्ण आढळून आला होता. अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक सर्व निर्बंध मागे घेतल्याने आता या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होण्याचा धोका संभवू शकतो, असंही अनेक तज्ञांच म्हणणं आहे.

जाणून घेऊया XE व्हेरियंट बद्धल

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, १९ जानेवारीला सर्वप्रथम या व्हेरिएंटचा पहिला रूग्ण ब्रिटनमध्ये आढळून आला. हे दोन व्हेरियंट ओमायक्रॉनची इतर रूपं असलेल्या ba.1 आणि ba.2 ची म्यूटेंट हायब्रिड आहेत. विशेष म्हणजे ओमायक्रॉनपक्षा या व्हेरिएंटची संक्रमणक्षमताही जास्त आहे.

युके हेल्थ प्रोटेक्शनच्या संशोधनानुसार नाक वाहनं, शिंका येणं आणि घशात खवखव होणं यांसारखी सौम्य लक्षणं या नव्या व्हेरिएंमध्ये पहायला मिळतात. तसेच चव व वास न येणं यांसारखीही काही लक्षणं काही रुग्णांमध्ये आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये