ताज्या बातम्यारणधुमाळी

‘…बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वत:वर कारवाईची वेळ आली की गायब झाले’- अतुल लोंढे

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी “आयएनएस ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या निधीसंदर्भात चौकशी सुरु असताना सोमय्या अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला घाबरत आहेत? त्यांनीही चौकशीला सामोरे जावे,” असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलं आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, “किरीट सोमय्या यांच्या ‘विक्रांत बचाव’ निधी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाली आहे. सोमय्या पिता पुत्र दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. असं असताना ते चौकशीला गेले नाहीत. दररोज विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वतःवर कारवाईची वेळ आली की गायब झाले, दोन दिवसांपासून ते ‘नॉट रिचेबल’ आहेत.

“‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली सोमय्या यांनी देशभावनेशी खेळ केला आहे. निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच ते पळून गेले तसेच सोमय्याही पळाले आहेत का? पळून जाण्यापेक्षा त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहिजे,” असं देखील लोंढें म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये