ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी
‘…मी या चोरांसोबत संसदेत बसणार नाही’- इम्रान खान

इस्लामाबाद : इम्रान खान यांची सत्तेतून हाकलपट्टी केल्यानंतर पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता आहे. तसंच इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयला विरोध करणार असल्याचं म्हटलं आहे. सर्व खासदार राजीनामे देतील आणि नवीन पंतप्रधान निवडीवर बहिष्कार टाकतील, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खासदार नॅशनल संसदेचा राजीनामा देतील आणि स्वातंत्र्यासाठी लढतील, असे यापूर्वी इम्रान खानचे सहकारी फवाद चौधरी म्हणाले होते. इम्रान खानसह पीटीआयच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आणि पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संसदेत बसणार नाही. मी या चोरांसोबत संसदेत बसणार नाही, असं इम्रान खान म्हणाले आहेत.