![बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठा झटका, 'हे' कर्ज महागणार... BANK OF INDIA](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/BANK-OF-INDIA-780x470.jpg)
मुंबई : बँक ऑफ इंडियानं बेस रेट दरात नुकतीच वाढ केली आहे. 0.05 टक्के वाढ करण्यात आलेल्या MCLR दरांचा थेट परिणाम आता ग्राहक कर्जांवर होणार आहे. १२ एप्रिल २०२२ पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज यामुळे वाढणार असल्याचं आता काही तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे, एक रात्र, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 0.05 टक्क्यांनी वाढवून 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के करण्यात आला आहे. MCLR च्या दरांचा थेट कर्जवाटपावर परिणाम होत असतो. त्यामुळे येणारा काळ हा कर्जवाढीचा असणार असल्याचा अंदाज आता वर्तविण्यात येत आहे.