शरद पवारांनी ‘द काश्मीर फाईल्सला’ विरोध दर्शवल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी दिलं उत्तर, म्हणाले…
मुंबई : सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॅाक्स ऑफीसवर देखील या चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. मात्र या चित्रपटावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात काही नेत्यांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे तर काही नेत्यांनी या चित्रपटावर टीका केली आहेत. यादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा या चित्रपटाचा उल्लेख करत विरोध दर्शवला आहे. तसंच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देखील त्यांनी या प्रकरणावर वक्तव्य केलं आहे. यावर आता विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्वीट करत उत्तर दिलं आहे. “या व्यक्तीचे नाव विवेक रंजन अग्निहोत्री आहे. काही दिवसांपूर्वी जो तुम्हाला विमानात भेटला होता, त्याने तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर तुम्ही काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवल्याबद्दल या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले.” असं ट्वीट विवेक अग्नीहोत्रींनी केलं आहे.