अर्थविश्लेषण

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चक्क १ रुपया प्रतिलिटर पेट्रोल वाटप

सोलापूर : १४ एप्रिल दिवशी जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा केली जाते. विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आणि उपक्रम देखील जयंतीनिमित्त राबवले जातात. मात्र सोलापूर जिल्ह्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एक निराळाच कार्यक्रम राबवला आहे. सध्या देशभर पेट्रोलच्या किमती वाढल्याची बोंब सुरु असताना सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीनं नागरिकांना फक्त एक रुपया प्रतिलिटर दराने पेट्रोल वाटप करण्यात आले आहे.

लोकांना एक रुपया प्रतिलिटर पेट्रोल मिळणे म्हणजे नागरिकांसाठी मेजवानीची सोयच झाली आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे. तर काही ठिकाणी उपक्रमावर टीका देखील केली जात आहे.

सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला जाऊन भिडल्या आहेत. रशिया युक्रेन युध्दामुळं आयात बंद आहे. तसेच आखाती देशातीलही पर बॅरेल कच्या तेलाच्या किंमतींत वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरातील जनता या दरवाढीन अक्षरशः होरपळून निघाली आहे. असं असताना सोलापुरातल्या या संघटनेनं एक रुपयात लिटरभर पेट्रोल वाटण्याचं धाडस दाखवलं आहे.

रुपयाच्या अवमूल्यनाचा आणि इंधन दरवाढीचा जवळचा संबंध असतो. रुपया वधारला कि महागाईची झळ कमी बसते. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच प्रश्नावर रुपयाची समस्या हा प्रबंध लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी प्रसिद्ध केला होता. रुपयाला जागतिक बाजारपेठेत वजन प्राप्त होऊन महागाई कमी व्हावी यासाठी काही व्यवहारीक बाबींचा धांडोळा त्यांनी घेतला होता. त्यामुळे सोलापुरातील संघटनेकडून करण्यात आलेल्या पेट्रोल वाटपाचा अन्वयार्थ महागाई स्वस्थ व्हावी असाच असल्याचं आपल्या लक्षात येईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये