पुणे

बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी; फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठान

पुणे : भारतरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने पुणे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलेक्टर ऑफिस व अरोरा टॉवर कॅम्प जवळील पुतळ्यावर हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर,अविनाश साळवे, साहिल केदारी, व प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद दत्ता अहिरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हॅलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या ८ वर्षापासून अरोरा टॉवर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती मंडप व विद्युत रोषनाई केली जाते. मागील २ वर्षी कोरोना मुळे जयंती साजरी करण्यात आली नाही, परंतु या वर्षी प्रचंड उत्साहात बाबासाहेबांची जयंती साजरा करण्यात आली तसेच अरोरा टॉवर चौकात मिरवणुकीने आलेल्या सर्व मंडळांचे व त्याच्या अध्यक्षांना फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने मिलिंद अहिरे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठानाचे रोहन अहिरे, निनाद अहिरे, विनील रणपिसे,रोहन साळवे, आशिष पवार,शरद मोरे, व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या ७ ते ८ वर्षा पासून फुले आंबेडकर लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्याचे महापौर व कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येत असते. परंतु या वेळेस दोन्ही ठिकाणी प्रशासक नेमल्यामुळे वरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये