देशाचे सामाजिक ऐक्य धोक्यात; शरद पवारांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

जळगाव : सध्या भाजपने महाराष्ट्राचे राजकारण खुप खालच्य पातळीचे करुन ठेवले आहे. यामुळे सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये हीच चिंता मला सध्या वाटते आहे. प्रश्न सोडवणे ही आपली परंपरा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आज केले आहे. आज जळगाव येथे विविध विषयांवर भाष्य करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्राची सत्त्ता हातची गेल्याने भाजप इतर राजकीय पक्षावर राष्ट्रीय संस्थांकडून दबाव आणू पाहात आहेत.
एखादी टोकाची भुमिका घेऊन पुढे जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला केंद्रातील पक्षाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन द्यावे याची काळजी वाटते. यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे याची चिंता वाटतं आहे. काहीही झालं तरी महाराष्ट्र एकसंध राहणार हे माञ निश्चत आहे. सर्व धर्म, जाती, भाषा यांमध्ये सामंजस्य असले पाहिजे. याला पोषक भुमिका घेणारी महाराष्ट्राची नेहमीच परंपरा आहे. पण आता भाजपने अशी परिस्थीती निर्माण केली आहे. त्यापासून दूर जाऊ की काय अशी भिती तयार होत आहे. देशात सध्या केंद्र सरकारच्या संस्थांचा वापर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्रातील पक्षाला काहीही करून येथील सत्ता हवी आहे. यामुळेच प्रादेशिक पक्षाच्या आधिकारावर व सरकारावर या संस्थांमार्फत दबाव आनला जात आहे.
महाराष्ट्रात भाजपचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळे येथे हस्तक्षेप करून येथील सत्ता हातात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते राज्य ताब्यात कसं घेता येईल यामागे भाजपा लागले आहेत, असा टोला पवारांनी लगावला. राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. भाजपचा राज्यात अपेक्षाभंग झाला आहे म्हणूनच महाविकास आघाडीवर दबाव आणत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.