‘तुमच्या दोघांचे प्रेम…’; प्रियांका चोप्राने दिल्या रणबीर-आलियाला लग्नाच्या खास शुभेच्छा
मुंबई : १४ एप्रिलला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर आलियानं आपल्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. आलियाने शेअर केलेल्या लग्नाच्या या फोटोंवर चाहत्यांसोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच प्रियांका चोप्राची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने आलिया-रणबीरच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत तिने त्या दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन. तुमच्या दोघांचे प्रेम आयुष्यभर असेच राहावे”, असं प्रियांकाने लग्नाच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे.
दरम्यान, रणबीर आणि आलिया यांना प्रियांका सोबतच कतरीना कैफ, दीपिका पदुकोन, शाहिद कपूर, अनुष्का शर्मा, अनिल कपूर, मनीष मल्होत्रा, निम्रत कौर, झोया अख्तर, दिया मिर्जा, नेहा धूपिया, नरगिस फकरी, सोनू सूद यांसह विविध बॉलिवूड कलाकारांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.