तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रतिबॅरल ११० डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यामुळे कंपन्यांवर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आजही दिल्ली-मुंबईसह देशातील चारही महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांत ८० पैशांच्या वाढीनंतर इंधनाचे दर स्थिर आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपासून कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल १०५.४१ रुपये प्रतिलीटरने विकले जात आहे, परंतु कच्च्या तेलाच्या किमती लवकर कमी न झाल्यास पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होऊ शकते, असा अंदाज डीलर्सचा आहे.
जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रतिबॅरल ११० डॉलरच्या पुढे गेली आहे. त्यामुळे कंपन्यांवर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा दबाव आहे. मात्र, जवळपास दोन आठवड्यांपासून कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल १०५.४१ रुपये प्रतिलीटरने विकले जात आहे.
चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर
मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये प्रतिलीटर
दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये आणि डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलीटर
चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये आणि डिझेल १००.९४ रुपये प्रतिलीटर
कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये प्रतिलीटर
पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही जाणून घेऊ शकता. तुम्ही ९२२४९ ९२२४९ वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९ ९२२४९ वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
देशातील तीन ऑइल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.