आझादी का अमृतमहोत्सव…
पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतामहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी प्रत्यक्ष तुरुंगवास भोगला आहे व ज्यांचा प्रत्यक्ष या लढ्यात सहभाग होता अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांशी सवांद साधून त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सन्मान करण्यात येत आहेत.
यानिमित्ताने सर्वप्रथम चिंचवडगावातील चापेकर चौकातील क्रांतिवीर चापेकर बंधूच्या समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांशी वैयक्तिक त्यांच्या घरी जाऊन त्याच्यांशी सवांद साधून सन्मान व सत्कार करण्यात आले.
यामधे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. वसंत तथा दादा केसकर, कै. सदाशिव नाथोबा सायकर, कै. जनार्दन गणपत मिरजकर, कै. जगन्नाथ विष्णू मिरजकर, कै. मारुती कृष्णाजी सायकर, कै. दिगंबर बाबूराव ढवळे, कै. वामन गणपत वस्ते, कै. वैजनाथ शंकरलाल पंडित, कै. निवृत्ती विठोबा वाळुंजकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात आले.
भाजयुमोच्या या उपक्रमात भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस व स्थानिक नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश क्रीडा विभाग संयोजक जयदेव डेंब्रा, युवती विभाग सहसंयोजिका व प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडये आदी उपस्थित होते.