‘Enough is Enough! आता…’; संजय राऊतांचा राणा दाम्पत्यांवर हल्लाबोल
नागपूर : गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना आणि राणा दाम्पत्यांमधील वाद मोठ्या प्रमाणात वाढल असून मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं नवनीत राणा आणि रवी राणा त्यांनी म्हंटलं होत. काल दाम्पत्य मुंबईमध्ये पोहचले आहे. त्यांनी आम्ही हनुमान चाळीस पठण करणारच हि भूमीका ठाम असल्याची स्पष्ट केले आहे .
तर दुसरीकडे राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक जमा झाले असून, खार येथील राणा यांच्या घराबाहरे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत राणा दाम्पत्य आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे . राऊत म्हणाले की , Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!! अस ट्वीट केलं .
तसेच तुम्ही जर मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत तुम्ही आम्हला कायदा शिकवू नका सरकारने काय करायला हवे काय नाही केले पाहिजे असे सल्ले तुंवाज्याकडून घेण्याइतकी वाईट वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही . तुम्ही जर आमच्या घरात घुसाल तर शिवसैनिक स्वस्थ बसणार असे ही राऊत म्हणाले.