पुणे
‘या’ कारणामुळे पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश थेट शरद पवारांकडे
पुणे : महाराष्ट्राचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची अचानक बदली करण्यात आल्याने त्याच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे . अशी तडकाफडकी बदली झाल्याने नाराज झालेले कृष्णा प्रकाश यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. कृष्ण प्रकाश यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांनी तत्काळ पदभार स्वीकारून कामकाजाला सुरूवातही केली.
पवारसाहेब आणि कृष्ण प्रकाश यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. तथापि, त्याचा तपशील समजू शकला नाही.परंतु कृष्ण प्रकाश यांनी आपली कैफियत मांडली असावी आणि स्वतःची बदली रद्द व्हावी अशी चर्चा करण्यात येत आहे. कारण इतर वेळी आवर्जून भेट देणारे सिंघम यांनी थेट बाहेर येऊन गाडीत बसून निघून गेले तर पवार साहेब कोल्हापूरकडे रवाना झाले.