राज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतून येणार २५०० हिंदू कार्येकर्ते; २००० पोलिसांचा बंदोबस्त
१ मे रोजी मनसेचे राज ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. या सभेला अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. राज ठाकरेंच्या या सभेसाठी अयोध्येतील तब्बल अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. यावेळची तब्बल दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे जाहीर सभा घेतली होती. तिथं त्यांनी मशिदींवरील भोंगे काढा नाहीतर आम्ही मासशिदींसमोर भोंगे लावून हनुमानचलीसा ऐकवू असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्यांनी उत्तर सभा देखील घेतली होती तेव्हाच त्यांनी १ मे रोजी औरंगाबाद मध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं होतं.
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंगे काढण्यासाठी २ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्याच्या एक दिवस आधीच औरंगाबाद मध्ये ही सभा होणार आहे.