इंधन दरवाढीचा फटका; ‘भात’ राहिला कच्चा!

आंबेमोहोर तांदळाला सर्वच हंगामात मागणी
परदेशात बासमती तांदळाला चांगली मागणी आहे. तसेच देशांतर्गतही मोठी मागणी आहे. यंदा तांदळाने भाववाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय बासमती तांदळाला परदेशांत मागणी चांगली आहे. त्यामुळे निर्यात वाढली आहे. तसेच लग्नसराईमुळे देशांतर्गत मागणी जास्त आहे. पुणे शहरात सर्वाधिक मागणी बासमती तांदळाची असते. आंबेमोहोर तांदळालाही सर्वच हंगामात मागणी असते.
पुणे : तांदळाच्या दराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आंबेमोहोर, कोलम, बासमती बजेटबाहेर गेले आहेत. बासमती तांदळाला परदेशात चांगली मागणी आहे. त्यामुळे निर्यात वाढली आहे. तसेच देशांतर्गत लग्नसराईमुळे मागणी जास्त आहे. पुणे शहरात सर्वाधिक मागणी बासमती तांदळाची असते. आंबेमोहोरलाही सर्वच हंगामात मागणी असतेच. मागच्या वर्षीपेक्षा यंदा तांदळाला जास्त मागणी आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोनानंतर देशात जोरात लग्नसराईत सुरू आहे. लग्नसराईत आणि परदेशांतून मागणी वाढली आहे. त्यातच इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. या सर्व कारणांमुळे बासमतीचे भाव वाढले आहेत. शहरात आंबेमोहोर चंद्रपूर, नागपूर दोन जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात येतो, तर पश्चिम बंगाल राज्यातूनही काही प्रमाणात आंबेमोहोर आपल्याकडे येतो. बाराही महिने पुणेकरांची आंबेमोहोरला पसंती असते. आंबेमोहोरच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. इंधन दरवाढीमुळे दळणवळण खर्च वाढला आहे.
पुण्यात बासमती तांदूळ मुख्यत: हरियाणा, पंजाब तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान येथून काही प्रमाणात येतो. आंबे तर चंद्रपूर आणि नागपूर, तसेच पश्चिम बंगालमधून येतो. तसेच कर्नाटक, नागपूर आणि चंद्रपूर कोलम तांदळाची आवक येथून होते. या सर्व ठिकाणचे अंतर खूप आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे गाडी भाड्यात मोठी वाढ झाली आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदा तांदळाला जास्त मागणी आहे.
आंबेमोहोर चंद्रपूर, नागपूर तसेच पश्चिम बंगालमधून येतो. तसेच कर्नाटक, नागपूर आणि चंद्रपूर येथून कोलम तांदळाची आवक होते. या सर्व ठिकाणचे अंतर खूप आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्यानेवाढत आहेत. पण इंधन दरवाढ आणि महागाईचा तांदळाला फटका बसणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.