राष्ट्रसंचार कनेक्ट

सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचा उपक्रम

ओतूर : श्रीक्षेत्र ओझर (ता.जुन्नर) येथे मंगळवारी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. गणेशपूजन श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त मंगेश मांडे, किशोर कवडे, आनंदराव मांडे, कैलास मांडे, राजश्री कवडे, विजय घेगडे, देवस्थान ट्रस्टचे माजी खजिनदार किसन माणदे, ग्रामविकास सदस्य प्रवीण वाळुंज, प्रकाश टेंभेकर यांच्या हस्ते करण्यात आले. साखरपुडा व टिळ्याचा मॉडेल असा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी वधूवरांना स्त्रीभ्रूणहत्या करणार नाही व करू देणार नाही, अशी शपथ देण्यात आली.


याप्रसंगी वधुवरांना विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त कैलास मांडे, जिल्हा परिषद सदस्य मोहोत ढमाले, गिरवलीचे सरपंच संतोष साईद, खोडद गावाचे माजी सरपंच जालिंदर डोंगरे, देवस्थान ट्रस्टचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, यांनी शुभाशीर्वाद दिले. सामूहिक विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. सरपंच जगन्नाथ कवडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये