रणधुमाळी

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठेवलं ‘किआन’; काय आहे नावाचा अर्थ जाणून घेऊया

मुंबई: नुकताच राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या मुलाचा नामकरण सोहळा आज पार पडला आहे. या बाळाचं नाव ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. मात्र या नावाचा अर्थ काय आहे, हे नाव भारतीय आहे की परदेशी, हेच नाव का निवडलं, असे अनेक प्रश्न या नावाच्या भोवती निर्माण झाले आहेत. त्यामुळे जाणून घ्या या नावाचा अर्थ.

राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा शिवतीर्थ या निवासस्थानी मित्र परिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला आहे. किआन असं बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात पाच एप्रिल रोजी किआनचा जन्म झाला. अनेकांना किआन हे परदेशी नाव वाटत असलं, तरी किआन हे हिंदू धर्मातलं नाव असल्याचं काही दाखले आढळतात. या नावाचे विविध अर्थ देखील आढळतात. किआन या नावाचे देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असे अर्थ सांगितले जातात. ज्याची रास मिथुन आणि नक्षत्र मृग आहे, त्यांचं हे नाव ठेवलं जातं. तसंच या नावावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये