महाराष्ट्र
आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; दोन वर्षांनंतर पायी वारीचा घेता येणार आनंद
पुणे / पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आषाढीवारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीला खंड पडला होता. परंतु यावर्षी वारकऱ्यांना पायी आषाढी वारी करता येणार आहे. राज्यातील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदाची बातमी म्हणजे आता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज याच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झालं आहे.
20 जूनला संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे तर 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. 9 जुलैला दोन्ही पालख्या पंढरपूर येथे पोहचणार आहेत.