महाराष्ट्र

‘डी-गँग’विरोधात तपास यंत्रणा आक्रमक

मुंबई : डी-गँगच्या वाढत्या अडचणीमुळे दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह आता मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाल्याची माहिती मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच ईडीने त्याची चौकशी केली होती. त्यामुळे अलीशाह याने ईडीच्या संभाव्य कारवाईला घाबरून दुबईत आसरा घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलीशाह हा दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा आहे. अलीशाह पारकर याची फेब्रुवारीमध्ये ईडीच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली होती. चौकशीनंतर तो लगेचच पत्नी आणि मुलीसह दुबईला गेला. नंतर तुर्कीला गेला आणि नंतर तेथून पुन्हा दुबईला परत आला.

ईडी अधिकार्‍यांनी केलेल्या चार तास चौकशीमध्ये अलीशाह याला दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकार्‍यांबद्दल प्रश्न विचारले होते. त्याशिवाय दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचीदेखील स्वतंत्रपणे चौकशी केली होती. इक्बाल कासकर मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमला मदत करीत असल्याचा आरोप आहे. एका खंडणीच्या प्रकरणात २०१७ मध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली होती. वर्ष २०१९ मध्ये, इक्बाल कासकरचा मुलगा रिझवान कासकर याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने खंडणी प्रकरणात अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये