देश - विदेश

भाजपात या अन् मुख्यमंत्री व्हा…

अगरतळा : बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी साहा यांच्या नावाची घोषणा केली होती. काँग्रेसमधून भाजपात आले आणि मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपात या अन् मुख्यमंत्री व्हा असे चार मुख्यमंत्री ईशान्येकडील राज्यात आत्तापर्यंत झाले आहेत. त्यामध्ये माणिक साहा हे चौथे मुख्यमंत्री आहेत. या अगोदर हिमंता बिस्वा सर्मा हे आसामचे मुख्यमंत्री, एन. बिरेन सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री, आणि नेफियू रिओ हे नागालँड मुख्यमंत्री आहेत, विशेष म्हणजे हे सर्व मंडळी काॅंग्रेस पक्षाला ठोकून भाजपमध्ये डेरेदाखल होऊन मुख्यमंत्री झालेली आहेत.

दरम्यान, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर माणिक साहा यांनी आता त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. माणिक साहा हे त्रिपुराचे भाजप अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि आता मुख्यमंत्री झाले आहेत, यावरुन अशी चर्चा चालु आहे भाजपात या अन् मुख्यमंत्री व्हा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये