महाराष्ट्ररणधुमाळी

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाची १० वक्तव्ये

१) कालची मुख्यमंत्र्यांची मास्टर सभा नाही तर लाफ्टर सभा होती.
२) मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा मधील एकच ओळ माहिती आहे. ती म्हणजे राम दुआ रे तुम रखवारे होत न आज्ञा ‘बिन पैसा रे’.
३) मै तो अयोध्या जा रहा था… बाबरी गीरा रहा था.. तुझको मिरची लगी तो मै क्या करू… फडणवीस बाबरी पडायला फक्त गेलाच नव्हता एक दिवस जेल मध्ये मुक्कामाला सुद्दा होता.
४) आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. इथपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. राजा महालातून बाहेर आल्याशिवाय त्याला गरीब काय कळणार.
५) बाबरी पडायला गेलो तेव्हा माझा एफएसआय २.५ होता. उद्धवजी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका.
६) तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला फडणवीस खाली आणल्याशिवाय राहणार नाही.
७) बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचा पोतं म्हणायचे. तुम्ही शरद पवारांच्या पायावर नाक घासून मुख्यमंत्री झालात. वजनदार लोंगो से संभाल के रहना.
८) आम्ही तरी शप्पथ घेतली होती तुम्ही तर आमची संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत लग्न केलं.
९) या देशात सध्या एकच शेर आहे तो नरेंद्र मोदी.
१०) तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. महाराष्ट्राचा बाप एकच छत्रपती शिवाजी महाराज.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये