राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचा संभाजीराजेंना पाठिंबा? म्हणाले…
पुणे : छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष लढवण्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचा दावा संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजेंना देऊ असं शरद पवारांनी नांदेडमध्ये सांगिलतं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केली आहे.