शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

मुंबई : अतिरिक्त ऊस गाळप अनुदान निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये दिनांक १ मे पासून अतिरिक्त ऊस गाळप होणाऱ्या ऊसासाठी अनुदान देण्यात येणार आहे. २०० रुपये प्रति टन ऊसाला अनुदान देण्यात येईल, तर पाच रुपये प्रति टन वाहतुकीला देण्यात येणार आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, अनेक शेतकऱ्यांवर ऊस गाळप शुल्काचा भार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक १ मे पासून अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, येत्या १ मे २०२२ पासून गाळप होणाऱ्या आणि साखर उताऱ्यामध्ये १० टक्केपेक्षा ०.५ टक्के घट कमी आल्यास व अंतिम साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी होणारे कारखाने घट उतारा अनुदानास पात्र राहतील, असंही या बैठकीत सांगण्यात आलं आहे. राज्यातील १०३ कारखान्यांपैकी शासनाच्या अटी पात्र करणारे कारखाने ५१ आहेत. या कारखान्याचे हंगामात अखेर एकूण संभाव्य गाळप १७.५ लाख टन होईल. या पात्र कारखान्यांना प्रतिटन २०० प्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्यात येईल. ५० किमी अंतरावरून येणाऱ्या ऊसासाठी पाच रुपये प्रति टन प्रमाणे वाहतूक अनुदान देण्यात येणार आहे.