आमच्या जखमांवर मीठ चोळायला अयोध्येत येत आहात का? राज ठाकरेंना भाजप खासदाराचा सवाल!
अयोध्या : खासदार बृजभूषण यांनी विरोध करत जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल टाकू देणार नाही असा इशारा दिला आहे. देशाचे नेते व्हायचं असेल तर व्हा, पण आधी माफी मागा, संताची नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागा, तेही नाही तर, योगींची माफी मागा, तेही करणार नसेल तर मग आमच्या जखमांवर मीठ चोळायला अयोध्येत येत आहात का? असा सवाल त्यांनी या वेळी केला. पुढे बोलताना बृजभूषण यांनी राज ठाकरे यांना पत्रकार परिषद घेऊन माफी मागा आणि ५ जूननंतर तुमचा दौरा ठरवा, तुम्हाला कोणताही विरोध होणार नाही असे स्पष्ट केले. दरम्यान त्यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, भाजप नेते बृजभूषण म्हणाले की, पाप करणारा पापात भागीदार नसतो, जो सक्षम असताना देखील पाप रोखण्याचा प्रयत्न करत नाही तो देखील त्यात भागीदार असतात, भाजपची राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भूमिका काय आहे, ते मला माहीत नाही, हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. अयोध्या सगळ्यांची आहे, सगळ्याना येथे येण्याचा अधिकार आहे, पण राज ठाकरे माफी न मागता अयोध्यात आले तर त्यांचा विरोध करणार असे त्यांनी याआधीच जाहीर केलं होतं.