जॅकलिनला भारत सोडून कुठेही जाता येणार नाही, न्यायालयाने फेटाळला अर्ज

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. तिच्यामागे इडीचा ससेमिरा सुरु झालेला आहे. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणारा सुकेश चंद्रशेखरनची जवळची मैत्रीण म्हणून जॅकलिन सध्या धारेवर आहे. सुकेश चंद्रशेखरनं तिला महागड्या भेटवस्तु दिल्याचीही चर्चा आहे.
सध्या जॅकलिनच्या अडचणींत अजूनच वाढ झालेली दिसत आहे. तिनं काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाकडे तिच्या घरी म्हणजेच श्रीलंकेत जाण्यासाठी कोर्टाकडं परवानगी मागितली होती. त्याचबरोबर विदेशात चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कोर्टाकडे एक अर्जही केला होता. कोर्टानं त्या अर्जावर सुनावणी पुढे ढकलली आहे.
ज्यावेळी ईडीनं सुकेशला अटक केली त्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलीनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे चौकशीसाठी जॅकलीनला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून तिच्या अनेक आगामी प्रकल्पांना आडकाठी लागलेली आहे.