आरोग्यदेश - विदेश

भाजप नेते नारायण राणे रुग्णालयात

मुंबई : (Central Minister Narayan Rane Admit on Lilawati Hospital) केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते (BJP Leader) नारायण राणे यांना आज लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणे यांच्यावर अॅंजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. त्यांना दोन दिवस विश्रांतीसाठी रुग्णालयात ठेवलं जाऊ शकतं. असंही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे नियमित तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात आले होते. यावेळी अॅंजिओग्राफी करण्यात आली असता काही ब्लाॅक आढळले . यानंतर त्याच्यवर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली. नारायण राणे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना दोन दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये