ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

“मी नॉनव्हेज खाल्ल्यामुळे मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही”; शरद पवारांनी दगडूशेठचं बाहेरूनच घेतलं दर्शन!

पुणे – Sharad Pawar Dagadusheth Halvai Temple | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आज पुण्यामध्ये (Pune) प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) दर्शनासाठी आले होते. मात्र त्यांनी मंदिरात न जाता दर्शन घेतल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. पवारांनी मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन का घेतलं नाही?, याबाबत पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP’s city president Prashant Jagtap) यांनी माहिती दिली आहे.

मी नॉनव्हेज (Non-veg) खाल्ल्यामुळे मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नसल्याचं शरद पवार म्हटले असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलं. बोलघेवड्या नेत्यांपेक्षा एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिल्याचंही जगताप म्हणाले.

दरम्यान, दगडूशेठच्या शेजारी असणारी गृह विभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याचे अनेक दिवसांची मागणी होती. त्यासाठी शरद पवार भिडे वाडा आणि दगडूशेठचा पाहणीसाठी आले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये