बाबो! ‘या’ क्रिकेटरची पत्नी म्हणते, “जोस बटलर माझा दुसरा पती”; नक्की काय आहे प्रकरण?

मुंबई | Jos Butteler | सध्या क्रिकेट (Cricket) विश्वात एक खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. राजस्थान रॅायल्सकडून (Rajsthan Royals) खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रसी व्हॅन डर डुसेनची (Rassie Van Der Dussen) पत्नी लाराने (Lara) जोस बटलरबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तिने इंग्लडचा क्रिकेटर जोस बटलर (Jos Butteler) हा माझा दुसरा पती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चांना उधान आलं आहे.Jos Butteler
रसी व्हॅन डर डुसेन आणि जोस बटलर हे दोघे आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॅायल्स (Rajsthan Royals) या संघाकडून खेळत आहेत. तसंच राजस्थानचा संघ आज दुसऱ्या क्वालिफायर स्पर्धेत आरसीबी (RCB) विरूद्ध खेळणार आहेत.
रसी व्हॅन डर डुसेनची पत्नी लाराने जोस बटलरला गंमतीने तिचा दुसरा पती असल्याचं म्हटलं आहे. तिनं त्याला दुसऱ्या पतीरुपात मानलं आहे. कारण आयपीएल २०२२ मध्ये जेव्हा जोस बटलर षटकार मारतो तेव्हा तिच्याकडे कॅमेऱ्याचं लक्ष जातं. तसंच चाहत्यांनी देखील चुकून रसी व्हॅन डर डुसेनची पत्नी लारा हिला जोस बटलरची पत्नी मानले आहे. मात्र लाराने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ती दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज रसी व्हॅन डर डुसेनची पत्नी आहे, जोस बटलरची नाही. जॉस बटलर जेव्हाही चौकार आणि षटकार मारत असे, तेव्हा कॅमेरा रसी व्हॅन डर डुसेनची पत्नी लाराकडे टर्न केला जात होता. त्यामुळं क्रिकेट जगतात मोठा गैरसमज निर्माण झाला.