लडाखमध्ये जवानांच्या गाडीचा भीषण अपघात; ७ जवानांचा जागीच मृत्यू
लडाख | Indian Army Solider’s Accident in Ladakh | लडाखमध्ये (Ladakh) भारतीय सैन्याच्या (Indian Army) गाडीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्याची गाडी लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये (Turtuk Sector) दरीत कोसळल्याने ७ जवानांचा (Solider’s) जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अन्य जवान जखमी झाले आहेत. Indian Army Solider’s Accident in Ladakh
भारतीय सैन्याच्या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते. यावेळी लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये त्यांची गाडी दरीत कोसळल्याने २६ जवानांपैकी ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकीचे जवान जखमी झाले आहेत. तसंच जखमी जवानांना सर्वोेत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सैन्यांच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा ट्रक हा परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरून (Tranjit Camp) हानिफ सेक्टरकडे (Hanif Sector) जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून (Thoies) २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे (Truck Driver) अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत (Shyok River) पडला. त्यामुळे या अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.