ताज्या बातम्यामहाराष्ट्र

Monsoon Arrival : अखेर मान्सूनचं केरळमध्ये आगमन; हवामान विभागाची माहिती

केरळ | Monsoon Arrival | सर्वांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. अखेर मान्सूनचं (Monsoon) केरळमध्ये (Kerala) आगमन झालं आहे. यासंदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागानं (Weather Department) दिली आहे. काही काळ मान्सून श्रीलंकेच्या (Shrilanka) वेशीवर अडकला होता मात्र, अखेर आज तो केरळमध्ये दाखल झाला आहे. तसंच पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. (Monsoon Arrival)

मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसंच केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढीच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होत असतो. यंदाही ४ ते ५ जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि अन्य ठिकाणी बरसणार आहे.

मान्सूनचा जूनमधील (June) प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र बरसेल अशी स्थिती दिसत आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं दिसत आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. तसंच मुंबईच्या परिसरात देखील पाऊस झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये