देश - विदेश

केंद्रसरकारचा मोठा निर्णय; एमएसपीच्या दरात वाढ!

नवी दिल्ली : आज मोदी सरकारने शेतकर्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांना दिला मिळणार आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांनच्या पिकांमध्ये एमएसपीची वाढ झाली आहे. एकूण १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली असल्याचं मंत्रिमंडळाने जाहीर केलं आहे. तसचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत देखील याबाबतीत माहिती दिली आहे.

या एमएसपीमध्ये तीळावर देखील ५२३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसचं २०२२-२३ या पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवून २,०४० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे. तसचं अनुराग ठाकूर यांनी सांगितल की, पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही उंचावत असते. त्त्याचबरोबर मुळे पिकाला चांगला भाव मिळत असतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी अमी उत्पन्नासाठी पावल उचलली गेली आहे.

दरम्यान, ठाकूर म्हणाले की, “आजच्या बैठकीमध्ये पिकांच्या खतासाठी दोन लाख दहा हजार कोटीचे अनुदान देण्यात येणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमाणे ठरवण्यात आलं होते की, खर्च अधिक ५० टक्के तो निर्णय आम्ही सातत्याने पुढे नेला आहे. किसान सन्मान निधी अंतर्गत दोन लाख कोटी रुपये खात्यात गेले असल्याचं देखील त्यांनी सांगितल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये