पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण!

पुणे : भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा रविवारी २६ जून रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अभिनेते विक्रम गोखले, प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल, अशी माहिती भाजप प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली.

ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला राज्य व देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी, काही निवडक लघुपट पंतप्रधानांनी स्वत: पाहून विशेष पसंती दर्शवली होती. त्यापैकी उत्कृष्ट लघुपटांना गौरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये