बाप रे! मैत्रिणीने अचानक बोलणं बंद केलं त्यानंतर घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
![बाप रे! मैत्रिणीने अचानक बोलणं बंद केलं त्यानंतर घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का! Fraud](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Fraud--780x470.jpg)
लखनऊ – Lucknow | आजकाल रागाच्या भरात माणूस काहीही करू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आझमगढमडमध्ये घडली आहे. मैत्रिणीने अचानक बोलणं बंद केल्याने तिचा मित्र चिडला आहे. रागाच्या भरात त्याने या तरुणीवर हल्ला केला आहे. यानंतर त्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात गच्चीवरून उडी मारली. त्यामुळे दोघेही या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
हल्लेखोर तरूण हा एकतर्फी प्रेमातून वेडा झाला होता. मात्र अचानक तरूणीने त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे या तरूणाने रागाच्या भरात मुलीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरूणी सराई मंद्रज गावात राहणारी आहे. तसंच हल्लेखोर तरूण देखील त्याच गावात राहतो. दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. तसंच या तरूणाचे तरूणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तरूणीचा याला विरोध होता. दरम्यान दोघांमध्ये यावरून भांडण झाले आणि तरूणीने त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे राग आल्याने तरूणाने तरूणीवर चाकूने वार करत हल्ला केला आहे.