देश - विदेश

एकनाथ शिंदे अन् बंडखोर आमदारांना रेडिसन ब्लू हॉटेलचा किती खर्च आला-वाचा सविस्तर

गुवाहाटी : सोमवार दि. २० जुन रोजी विधानपरिषदेच्या १० जागांचा निकाल लागला. त्यानंतर मध्यरात्रीपासून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे काही आमदारांना सुरत येथे घेऊन गेले. अन् राज्याच्या राजकारणात भूकंप आला. नंतर काही आमदार राज्यात परतत होते म्हणून शिंदे यांनी त्यांचा मुक्काम आसाममधील गुवाहाटी येथे हालवला.

दरम्यान, पुढे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी देशातील महागड्या हाॅटेलमध्ये नोंद होणाऱ्या “रेडिसन ब्लू” या हॉटेलमध्ये आठ दिवस राहिले. राज्यात या हाॅटेलच्या बिलाबाबत खुप चर्चा रंगत होत्या. शिंदे आणि बंडखोर आमदार यांना आठ दिवसांचे दिल हे तब्बल 68 ते 70 लाख रुपयांच्या दरम्यान आल्याची माहिती आहे.

सर्व रुमचे आमदारांच्या आठ दिवासांचे भाडे डिस्काउंट आणि टॅक्स मिळून अंदाजे 68 लाख तर जेवणाचे बिल सुमारे 22 लाख रुपये आल्याचे समजते. तर एका दिवसाचं रूमचं भाडं सुमारे 7500 च्या आसपास तर, डिलक्स रुमचे भाडं दररोज 8500 रुपये आहे. एवढेच नव्हे तर, हॉटेल बुकिंगवेळी येथे असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजेच 70 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये