ताज्या बातम्यामनोरंजन

समांथाने खासगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, “माझ्या वैवाहिक…”

मुंबई | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्कि नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. तसंच ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर आता ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे ती प्रचंड चर्चेत आली आहे. त्याचबरोबर नुकतंच समांथाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नुकतंच समांथाने कॉफी विथ करणच्या ७ व्या पर्वात हजेरी लावली होती. यावेळीचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी अभिनेता करण जोहरने तिला नागाचैतन्यसोबत घटस्फोट घेण्यावरुन एक प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, “माझ्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभवांचे सर्वात मोठे कारण तुम्हीच आहात. लग्न हे ‘कभी खुशी कभी गम’ सारखे असते हे तुम्ही चित्रपटांमध्ये दाखवले आहे. मात्र ते खऱ्या आयुष्यात KGF सारखे आहे आणि त्यामुळे सगळेच नाराज आहेत.”

दरम्यान, समांथा आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या जवळपास ४ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. यानंतर तिला ट्रोल करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये