देश - विदेश

डोळ्यात डोळे घालून बोला’वरुन बंडखोरानी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली; म्हणाला, “त्यांचे डोळे…”

बुलढाणा : (Sanjay Gaikawad On Aditya Thackeray) शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक देवाणघेवाण सुरुच आहे. त्यातच आता बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी थेट माजी मंत्री आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. 

दरम्यान, माध्यमांनी गायकवाड यांना आदित्य ठाकरे यांनी केलेल्या बंडखोर आमदारांबद्दल डोळ्यात डोळे घालून चर्चा करण्याच्या आव्हानाचा संदर्भ देत प्रश्न विचारला. आदित्य यांचे डोळेच दिसत नाही अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली. त्यांचे डोळे दिसतील तर मिळवतील अशी  गायकवाड यांनी त्यांची खिल्ली उडवली. बुलढाणा येथे परतल्यावर गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी संजय राऊत यांच्यासहीत शिवसेनेच्या कारभारावरुन नाराजी व्यक्त करत रोखठोक शब्दांमध्ये टीका केली.

गायकवाड यांनी राऊत यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. संजय राऊत यांनी जर बाप काढला तर मलाही काढता येतो. ज्या ४२ जणांनी त्यांना मतदान केले  ते सर्व त्यांचे पण बाप आहेत. आधी खासदारकीचा राजीनामा द्या. मग आम्हाला सांगा, असा टोला गायकवाड यांनी लगावला. राष्ट्रपुरुष कुणाचा व्यक्तिगत नसतो, देशाचा असतो. आमच्या प्रत्येक फलकावर बाळासाहेबांचे छायाचित्र असणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये