“लग्नानंतर पहिल्याच वर्षी पळून…”, फराह खानचा धक्कादायक खुलासा

मुंबई | बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने आजवर अनेक बड्या सिनेमांसाठी कोरिओग्राफी केली आहे. तसंच फराहला दिग्दर्शक म्हणूनही बॉलिवूडमध्ये ओळखलं जातं. फराहने रियॅलिटी शोमध्ये जजची भूमिका पार पाडत अनेकांना प्रोत्साहन दिलंय. त्याचबरोबर दिलखुलास अंदाजासाठी फराह ओळखली जाते.
फराहने नुकतात तिच्या वैवाहिक आयुष्यातील सुरुवातीच्या काळाबद्दल खुलासा केला आहे. मिका सिंगच्या ‘स्वयंवर: मिका दी वोहती’ या शोमध्ये फराहने नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये फराहने लग्नानंतर ती घर सोडून पळून जाणार होती असा खुलासा केला आहे.
‘स्वयंवर: मिका दी वोहती’ या शोमध्ये फराहने मोठी धमाल केली आहे. यावेळी तिने लग्नानंतरचा अनुभव शेअर केला आहे. 2004 सालामध्ये फराहने फिल्म एडिटर शिरिष कुंदेरसोबत विवाह केला होता. मिकाच्या शोमध्ये फराहने स्पर्धकांच्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी फराहने लग्नानंतर तिला पळून जावसं वाटत होतं असा खुलासा केला आहे.
मिकाबद्दल बोलताना फराह म्हणाली, “मिका खूप संवेदनशील व्यक्ती आहे. एखादी जबाबदार मुलगीच त्याला सांभाळू शकते. मला वाटतं लग्नासाठी वय ठरलेलं नाही. तुम्हाला योग्य व्यक्ती मिळेल तेव्हाच तुम्ही लग्न करा. मी तर माझ्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी पळून जायचा विचार करत होते. कारण त्यावेळी सर्व काही सांभाळणं खूप कठीण झालं होतं.” असं फराहनं म्हटलं आहे.