क्राईमताज्या बातम्या

चंद्रशेखर गुरुजींच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती आली समोर

बेंगलोर | कर्नाटकातील हुबळी येथे धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘सरल वास्तू’चे संस्थापक चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचं वृत्त हाती येत आहे. चंद्रशेखर गुरुजी यांची चाकूचे सपासप वार करुन हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे.

महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड हे दोघे आरोपी चंद्रशेखर गुरूजी यांच्याकडे काम करत होते. गुरूजींनी या दोघांचा स्वत: पुढाकार घेवून विवाह केला होता. नंतर त्यांना प्लॉटदेखील दिला होता. 2019 पर्यंत हे गुरूजींच्याकडे काम करत होते. नंतर त्यांनी काम सोडले. काम सोडल्यावर गुरुजींनी त्यांच्याकडे प्लॉट परत करण्याचा तगादा लावला होता. 

दरम्यान, गुरूजींच्या हत्येनंतर पोलिसांनी नाकाबंदी करुन शोध सुरू केला होता. एसीपी विनोद यांच्या पथकाने मारेकऱ्यांना रामदुर्ग येथे ताब्यात घेतलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये