“माझ्यामुळे शिंदेंना उमेदवारी मिळाली, आयुष्यातील मोठं पाप”
!["माझ्यामुळे शिंदेंना उमेदवारी मिळाली, आयुष्यातील मोठं पाप" Eknath shinde 6](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Eknath-shinde-6.jpg)
मुंबई – Vinayak Raut on Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
कोणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायचं, स्वत:च्या हाताने ट्वीट करता येतं का?, याचा शोध घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होत आहे. आयुष्यातील मोठं पाप झालंय, मी सांगितलं नसतं तर एकनाथ शिंदेना आमदारकी मिळाली नसती, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार नाही. जे मनापासून माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यासोबत राहा तुमचं दुसरीकडे भविष्य उज्वल असेल तर जरूर जा. एवढ्या मोठया मनाचा नेता आम्हाला लाभला यातच आम्हाला समाधान असल्याचंं राऊत म्हणाले.