पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

डॉ. दिलीप मालखेडे यांची बार्टीला भेट

पुणे : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी भारतीय राज्यघटनेची प्रत देत त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. मालखेडे म्हणाले, वंचित घटकांना शैक्षणिकदृष्ठ्या सक्षम करण्याचे काम बार्टी करीत आहे.

सामाजिक व आर्थिकदृष्ठ्या मागासलेल्या वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी शैक्षणिक योजना प्रभावीपणे अमलात येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यापीठ बार्टीसोबत काम करेल. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने संशोधन व प्रशिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी बार्टी कटिबद्ध असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले. यावेळी बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, विभागप्रमुख डॉ. जोत्स्ना पडियार, वृषाली शिंदे, उमेश सोनावणे, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे, सुमेध थोरात व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये