ठाण्यात शिंदेंनी ६६ नगरसेवक फोडले; मात्र एक निष्ठावंत राहिला शिवसेनेतच!

ठाणे : (Eknath Shinde On Shivsena Corporator) जिल्हाचा शिवसेनेचा ढाण्या वाघ समजले जाणारे धर्मवीर आनंद दिघे यांचे आपघाती निधन झाले, अन् ठाण्याची सर्व जबाबदारी त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यावर आली. मात्र, शिवसेनेचे एकनिष्ठ असलेले शिंदे यांनीच शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारले आणि राज्याच्या राजकारणात भुकंप आला. शिंदे यांनी बंडखोर ५० आमदारांच्या बळावर आणि भाजपच्या मदतीनं दि. ३० जुन रोजी नविन सरकार स्थापन केलं.
दरम्यान, या सर्व पार्श्वभुमीवर ठाण्यात एकहाती वर्चस्व असलेल्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक झालेल्या अनेकजन शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामिल झाले. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे एकून ६७ नगरसेवक आहेत. यापैकी ६६ नगरसेवक शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. मात्र, यात नगरसेविका अशा आहेत ज्या शिवसेनेसोबत आजही एकनिष्ठ आहेत.
शिवसेनेचा हा एकमेव कट्टर शिवसैनिक कोण आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा कडवा निष्ठावंत कोण आहे, याची माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेच्या बाजूने ठामपणे उभ्या राहणाऱ्या या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या आहेत.