आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्र्यांना पक्ष फुटीची भिती? पक्षाची घटना बदलली!

हैदराबाद : (JaganMohan Raddy On Change the party Policy) मागील काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आणि त्याचे पडसात देशभर पसरल्याचे पहायाला मिळत आहेत. सेनेच्या तब्बल ४० आमदारांना सोबत घेत पक्ष अध्यक्षांच्या विरुद्ध शड्डू ठोकला. यामुळं शिवसेनेची देशभर नचक्की झाली. आणि तत्कालिन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून पायउतार होवा लागलं.
दरम्यान, बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं नविन सरकार स्थापन केलं. या बंडानंतर देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांमध्ये भितीचं वातावरण पहायाला मिळत आहे. आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पक्ष फुटीचा धसका घेतला असल्याचं पहायाला मिळत आहे. या पार्श्वभुमीवर रेड्डी यांनी आपला वायएसआर काॅंग्रेसच्या बैठकीत पक्षाच्या घटनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
एक म्हणजे, रेड्डी यांनी आपल्या युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीचे नाव बदलून आता वायएसआरसीपी असं नामकरण करण्यात आलं आहे. तर दुसरं वायएसआर काँग्रेस पक्षाचे आजीवन अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळं एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. पक्षफुटीच्या भीतीने तर हा आजीवन अध्यक्ष होण्याचा निर्णय जगनमोहन रेड्डी यांनी घेतला नाही ना?