डी पी यु मध्ये एज्युकेशन – ‘इंडस्ट्री कनेक्ट’ चा अभिनव प्रयोग

डीपीयू – वीणा वर्ल्ड संकल्पनेतून नवा कोर्स पुणे
कौशल्याधिष्ठीत शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी आणि समाजाच्या अर्थकारणाला चालना मिळावी हा मूळ उद्देश उच्च शिक्षणाच्या पाठीमागे आहे, केवळ अकॅडमीक एज्युकेशन मध्ये हरवत चाललेला हा उद्देश डी वाय पाटील सोसायटीने पुन्हा एकदा साध्य करण्यास सुरुवात केली आहे. याच माध्यमातून ट्रॅव्हल अँड टुरिझम चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट ‘इंडस्ट्री कनेक्ट‘ करण्याचा एक अभिनव प्रयोग डीपीयू च्या माध्यमातून सध्या होत आहे .
डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि विना वर्ल्ड या संस्थांनी एकत्रित येऊन ट्रॅव्हल अँड टुरिझम सर्टिफिकेट कोर्स ची निर्मिती केली आहे. डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील आणि वीणा वर्ल्डच्या संचालिका विना पाटील यांच्या संकल्पनेतून हा नवा प्रयोग साकारण्यात येत आहे.
डी वाय पाटील, आय एम एच सी टी ताथवडे कॅम्पसचे प्रिन्सिपल डॉ. मिलिंद पेशवे यांनी याबाबत पुढाकार घेऊन, ‘विना वर्ल्ड या ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपनीच्या माध्यमातून शिक्षण – उद्योग कनेक्टिव्हिटी ला हा नवा आयाम दिला आहे’. येत्या मंगळवारी 19 तारखेला या माध्यमातून सादर होत असलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम सर्टिफिकेट कोर्स चा लोकार्पण सोहळा होत आहे.
अकॅडमी एक्सलन्सीच्या पुढे जाण्याची गरज :
त्या त्या क्षेत्रातील ‘इंडस्ट्रीज कनेक्ट’ करून विद्यार्थ्यांना अधिक रोजगारभिमुख आणि सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण तर डीपियु मध्ये दिले जातेच, परंतु त्याही पुढे जाऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारे प्रॅक्टिकल नॉलेज देखील आता दिले जाईल.
_डॉ. सोमनाथ पाटील, डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव
यामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून थेट रोजगार निर्मिती व्हावी यासाठी इंडस्ट्रीमध्ये नेमके काय चालू आहे? त्याचे प्रवाह थेट शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये यावेत, हा या पाठीमागचा उद्देश आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम चे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नको तर आज इंडस्ट्रीमध्ये सर्वोच्च स्थानी असणाऱ्या या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मार्गदर्शन मिळावे, नेमकी इंडस्ट्री कशी चालते आणि इंडस्ट्रीची गरज काय आहे? हे अभ्यासक्रमांमध्येच ‘प्रॅक्टिकल एज्युकेशन’च्या माध्यमातून समजावे, हा या पाठीमागचा उद्देश आहे.