क्रिएटिव्ह फाउंडेशनतर्फे कामगार महिलांना रेनकोट भेट

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर घरेलू कामगार महिलांना रेनकोट भेट उपक्रम राबविण्यात येत होता. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डी. पी. रस्त्यावरील राजर्षी शाहू वसाहत येथील भगिनींना रेनकोट भेट देऊन ह्या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक जयंत भावे, भाजप प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे, भटक्या-विमुक्त आघाडीचे सुनील होलबोले, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ अथणीकर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
घटकाला सतत मदतीचा ओघ सुरू राहावा आणि ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे, ती ओळखून त्याला ती वस्तू दिली जावी, असा संदेश आमचे गुरू आणि अविरत सेवाकार्यात मग्न असणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आणि त्यास अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन असे उपक्रम राबवत असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.