अर्थताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“सध्या महाराष्ट्राचे ‘हे’ दोघेच मालक” – अजित पवार

मुंबई : (Ajit Pawar On Shinde Government) गुरुवार दि. १४ रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे सरकारनं राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला. त्यामुळं पेट्रोलचे दर ५ तर डिझेलचे दर ३ रूपयांनी कमी झाले आहेत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, जेव्हा भाजप विरोधीपक्षात होते तेव्हा त्यांनी इंधनावरील टॅक्स ५० टक्क्यावर करण्याची मागणी केली होती. आता तर त्यांचेच सरकार आहे. मग त्यांनी टॅक्स ५० टक्क्यावर का नाही आणला? असा सवाल केला आहे.

दरम्यान, त्यांनी केलेल्या मागणीनुसार बदल केले असते तर डिझेल ११ आणि पेट्रोल १७ रूपयांनी कमी झाले असते, पण त्यांनी हा निर्णय घेतला नाही असं पवार म्हणाले आहेत. मी अर्थमंत्री असताना गॅसवरील टॅक्स तेरा टक्क्यावरून ३ टक्क्यावर आणला. यामुळं एक हजार कोटी रूपयांचा भार सरकारवर पडला होता. उद्या केंद्र सरकारकडून भाव वाढवले जातील त्यामुळं परत इंधनाचे दर वाढतील. सध्या राज्य सरकार पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन संचालकांची नियुक्ती केली नाही. सध्या पावसाळा सुरू असताना बऱ्याच दुर्घटना घडत असतात त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला पूर्णवेळ संचालकाची आवश्यकता आहे. पण राज्यात सध्या हे दोनंच मालक आहेत आणि सगळा भार यांच्याच खांद्यावर आहे असा टोला अजित पवारांनी नाव न घेता शिंदे आणि फडणवीसांवर लावला आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये