ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो”

कल्याण | Vishawanath Bhoir On NCP – “महाविकास आघाडीतून बाहेर पडलो याचा अर्थ आम्ही गद्दार नाही, मी शिवसैनिकच आहे. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव होता म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलिन झालो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको. महाविकास आघाडीतून बाहेर पडून जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी,” असं आवाहन शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आज (15 जुलै) पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.

शिंदे गटातील कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहेत. तसंच शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या शहर प्रमुख पदाबाबत चर्चा सुरू होती. यासंदर्भात बोलताना आमदार भोईर यांनी शहर प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत त्यांनी माझी शहर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचं भोईर यांनी सांगितलं आहे.

पुढे भोईर म्हणाले, नवी मुंबई येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबतचा जो निर्णय आहे. तो मंत्रिमंडळात होईल, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र सदर बैठक वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. मात्र दि. बा. पाटलांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरु. हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे आणि या भूमिपुत्रांचा आक्रोश आहे. त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आणि सकारात्मक उत्तर घेणार.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये